मुंबई – 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर अबू सालेमला विशेष सत्र न्यायालयाने दिलासा दिला. अटक झाल्यापासूनचा शिक्षा होईपर्यंतचा 12 वर्षांचा कालावधी शिक्षेतून माफ करण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे.
अबू सालेमला 2005 मध्ये पोर्तुगाल सरकारने भारताच्या हवाली केले होते. त्यानंतर सालेमवर मुंबई साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी खटला चालवण्यात आला आणि 2017 मध्ये टाडा न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सध्या तो नवी मुंबईतील तळोजा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सालेमने याप्रकरणातील अटकेच्या तारखेपासून ते त्याला शिक्षा सुनावली जाईपर्यंत म्हणजेच 11 नोव्हेंबर 2005 ते 7 सप्टेंबर 2017 हा तुरूगांत घालवलेला 12 वर्षांचा कालावधी शिक्षेतून कमी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्याच्या अर्जावर न्यायालयाचे न्यायाधीश बी.डी.शेळके यांनी त्याची मागणी मान्य करत अबू सालेमला दिलासा दिला. दरम्यान, माझ्या जिवाला धोका आहे. त्यामुळे तळोजा कारागृहातून इतरत्र कुठेही मला हलवू नका, अशी विनंती अबू सालेमने न्यायालयाकडे केली होती. मात्र न्यायालयाने
ही विनंती फेटाळली.
अबू सालेमला कोर्टाचा दिलासा शिक्षेतून 12 वर्षांचा कारावास माफ
