काबूल
अफगाणिस्तानात आज पहाटे ३ :१४ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपचा केंद्र जमिनीपासून ७३ किमी खोलीवर होता, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. या भूकंपात कोणतीही जिवितहानी झाली नाही. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानात ऑक्टोबरमध्ये देखील जोरदार भूकंपाचे धक्के बसले होते. ज्याची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपात सुमारे २५०० लोकांनी जीव गमावला होता. यावेळी सुमारे ९ हजार लोक जखमी झाले होते.