काबूल – अफगाणिस्तानमध्ये काबूलपासून १४९ किलोमीटर अंतरावर ४.२ रिश्तर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली १० किलोमीटरवर होते. हा भूकंप शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (एनसीएस) या भूकंपाची माहिती दिली. गेले काही महिने अफगाणिस्तानमध्ये दर २ ते ३ आठवड्यांनी भूकंप होत आहेत.
११ मे रोजी फैजाबादच्या दक्षिण-नैऋत्येस ९९ किलोमीटर अंतरावर ४.५ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्याआधी ९ मे रोजी फैजाबादमध्ये ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती एनसीएसने दिली. गेल्या महिन्यात, तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथोरिटीने असा अहवाल दिला की, मागील महिन्यात नैसर्गिक आपत्तींमुळे १३ प्रांतांमध्ये किमान ४२ नागरिक मारले गेले आणि ५४ जण जखमी झाले.
अफगाणिस्तानात काबूलजवळ ४.२ रिशतर स्केलचा भूकंप
