Home / News / अफगाणिस्तानातील लसूण पुण्यातील बाजारात दाखल

अफगाणिस्तानातील लसूण पुण्यातील बाजारात दाखल

पुणे- बाजार समितीमध्ये अफगाणिस्तानातील सुमारे ३० टन लसणाची आवक झाली आहे. त्यामुळे लसणाचे दर तुलनेने नियंत्रणात आले आहेत. सध्या प्रति...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पुणे- बाजार समितीमध्ये अफगाणिस्तानातील सुमारे ३० टन लसणाची आवक झाली आहे. त्यामुळे लसणाचे दर तुलनेने नियंत्रणात आले आहेत. सध्या प्रति किलोला लसणाचे दर अनुक्रमे ३२० ते ३६० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.
अफगाणिस्तानातील लसूण मुंबई, दिल्ली, दक्षिण भारतात दाखल होऊ लागला आहे. यामुळे टंचाई कमी होऊन दर नियंत्रणात आले आहेत. हा लसूण आला नसता तर किरकोळ बाजारातील लसणाच्या दरात मोठी वाढ होऊन प्रति किलोचे दर ५०० रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता होती. काही ठिकाणी लसणाचे दर ५०० च्या जवळपासही पोहोचले आहेत.गेल्या हंगामात लसणाच्या उत्पादनात घट झाल्याने बाजारात लसणाचा तुटवडा जाणवत आहे.

Web Title:
संबंधित बातम्या