अथेन्स – रोममध्ये दोन वर्षापूर्वी झालेल्या रेल्वे अपघाताच्या स्मृतीप्रित्यर्थ आज रोममधील रेल्वे ठप्प करण्यात आली. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या या अपघातात ५७ जणांना प्राण गमवावे लागले होते. या आंदोलनात विविध कामगार संघटना तसेच व्यावसायिकांनीही भाग घेतला.
या मृतांच्या नातेवाईकांनी काल देशभर निदर्शने करुन रेल्वेसेवाच बंद पाडली. यावेळी नागरिकांनी सत्ताधारी कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या अपघाताला राजकीय लोकांनाच जबाबदार धरायला हवे होते अशी मागणी यावेळी त्यांनी केली. रोम सरकारने या अपघातप्रकरणी काही रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई केली.
रोमच्या टेम्पा शहराजवळ एक प्रवासी रेल्वे गाडी मालगाडीला आदळून हा अपघात झाला होता. त्यानंतर दोन्ही रेल्वेगाड्या रुळावरुन घसरल्या होत्या. कालच्या नागरिकांच्या आंदोलनामुळे काही विमानेही रद्द करण्यात आली. अनेक कामगार संघटनांनीही या आंदोलनात भाग घेतला होता. मृतांच्या नातेवाईकांनी मात्र राजकीय आंदोलनापेक्षा अपघाताच्या स्मृतीवर लक्ष देण्याचे आवाहन केले होते.