Home / News / अनिल देशमुखांच्या घरासमोर अजित पवार गटची बॅनरबाजी

अनिल देशमुखांच्या घरासमोर अजित पवार गटची बॅनरबाजी

नागपूर- राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. यावर...

By: E-Paper Navakal

नागपूर- राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. यावर अजित पवार गटाचे नागपूर शहरप्रमुख प्रशांत पवार आणि जिल्हाप्रमुख बाबा गुजर यांनी देशमुखांच्या घरासमोरच भले मोठे बॅनर लावून त्यांना डिवचले आहे. या बॅनर “महाराष्ट्राने ठरवले राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे वारसदार अजितदादाच आणि ‘तुतारी’चे निवडून आलेले दहा आमदारांचे दादा हेच वाली, असा ठळक उल्लेख केला आहे. देशमुखांच्या घरासमोर लावण्यात आलेल्या बॅनरची मोठी चर्चा आहे.

Web Title:
संबंधित बातम्या