नागपूर – निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी १८ नोव्हेंबर रोजी काटोल जवळ अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला होता. यात देशमुख जखमी झाले होते. अनिल देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा काटोलचे भाजपा आमदार चरणसिंह ठाकूर यांचे बंधू राजा ठाकूरसह त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
पोलीस तपासात अनिल देशमुख यांनी सांगितले आहे की, दगडफेकीच्या घटनेनंतर काही अंतरावर असलेल्या रेल्वे क्रॉसिंग जवळ काटोलचे आमदार चरणसिंह ठाकूर यांचे बंधू राजा ठाकूरशी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला होता. राजा ठाकूर ने पोलिसांना सांगितले की, घटनेच्या दिवशी मी त्या परिसरातच उपस्थित नव्हतो, त्यावेळी मी काटोल तालुक्यात दुसऱ्या परिसरात होतो. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.