मुंबई – मुंबईत सध्या अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचा पुत्र अनंत यांच्या शाही विवाह सोहळयाची चर्चा आहे. महिनाभरापूर्वी सुरू झालेला हा सोहळा १५ जुलैपर्यंत चालणार आहे. अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या या शाही विवाहसोहळ्यावर ५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले . मुकेश अंबानींसाठी हा खर्च अगदीच मामुली आहे,असे जाणकार सांगतात.मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज या उद्योगसमुहाचे बाजारमूल्य चालू वित्तीय वर्षात सुमारे १०,१८, ६१२ कोटी रुपये आहे.त्याच्या तुलनेत अनंत यांच्या विवाह सोहळ्यावर झालेला खर्च अवघा अर्धा टक्के आहे, असे सांगितले जाते.या शाही विवाहसोहळ्याला मार्च महिन्यात सुरूवात झाली.देश-विदेशातून असंख्य बड्या व्यक्ती यात सहभागी झाले होते. युरोपमध्येही खास सोहळा आयोजित करण्यात आला होता.दरम्यान, मुंबईत आज अनंत-राधिका यांच्या लग्नविधीसाठी उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी तीन फाल्कन-२००० जेट विमाने आरक्षित करण्यात आली होती . त्याव्यतिरिक्त शंभर खासगी विमाने पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी वापरली गेली. देशाच्या विविध शहरांमधून खासगी विमानांनी पाहुण्यांना मुंबईत आणण्यात आले आणि पुन्हा नेऊन सोडण्यात आले,अशी माहिती ‘क्लब वन एअर’च्या वतीने सांगण्यात आले.