मुंबई- रिलायन्सचे उद्योगपती अनंत अंबानी यांनी काल मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली . दोघांमध्ये दीड ते दोन तास बंद दाराआड चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीच्या काळात झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. याच महिन्यात अनंत अंबानी यांनी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांचीही भेट घेतली होती .
अनंत अंबानी- फडणवीस मध्यरात्री भेट
