नवी दिल्ली
अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस आजपासून अल्पकालीन अतिरिक्त देखरेख (एएसएम) फ्रेमवर्कमधून वगळण्यात आली आहे. २ जूनला अदानी एंटरप्रायझेसला अल्पकालीन एएसएम फ्रेमवर्कमधून बाहेर काढले जाईल, असे बीएसई आणि एनएसईने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे. या निर्णयामुळे अदानी कंपनीला दिलासा मिळाला आहे.
शेअर्समध्ये फेरफार केल्याच्या आरोपावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. त्यानंतर अदानी एंटरप्रायझेसला २४ मे रोजी अल्पकालीन देखरेख फ्रेमवर्कमध्ये ठेवण्यात आले. एनएसई आणि बीएसई एक्सचेंजने गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकात आता त्यांना मॉनिटरिंगमधून काढून टाकण्यात येईल, असे म्हटले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर अनेक आरोप केले होते. यानंतर या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक पॅनल तयार केले होते. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये फेरफार केल्याचा कोणताही स्पष्ट संकेत नाही, असे पॅनेलने १७३ पानांच्या अहवालात म्हटले होते