Home / News / अदानी लाचखोरी प्रकरणावरून लोकसभेत कामकाज पुन्हा तहकूब

अदानी लाचखोरी प्रकरणावरून लोकसभेत कामकाज पुन्हा तहकूब

नवी दिल्ली- अदानी लाचखोरी प्रकरणी विरोधी पक्षांनी चौकशीचा मुद्दा लावून धरला. त्याला परवानगी न मिळाल्यामुळे आजही लोकसभेत शून्य प्रहरात मोठा...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली- अदानी लाचखोरी प्रकरणी विरोधी पक्षांनी चौकशीचा मुद्दा लावून धरला. त्याला परवानगी न मिळाल्यामुळे आजही लोकसभेत शून्य प्रहरात मोठा गोंधळ झाला. अखेर लोकसभा सभापतींनी कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब केले.
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवसही अदानी प्रश्नी चौकशीच्या मागणीने गाजला. विरोधी सदस्यांनी हातात संविधानाची प्रत घेऊनच लोकसभेत प्रवेश केला. शून्य प्रहरात सभापतींसमोर अदानी लाचखोरी प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने गोंधळ झाला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरु झाल्यावरही गोंधळ झाल्याने शेवटी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. सभागृहाचे कामकाज आता सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल. राज्यसभेचे कामकाजही आज दुपारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Web Title:
संबंधित बातम्या