वॉशिंग्टन : अमेरिकेच्या हिंडेनबर्ग संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी समूहाने फॉलो-ऑन पब्लिक ऑफर मागे घेतला. यानंतर बड्या कंपन्यांच्या अधिग्रहण प्रक्रियेतून माघार घेतली. तसेच काही कंपन्यांनी अदानी समूहाशी होत असलेले करार रद्द केले. यानंतर आता अमेरिकन बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा कंपनी जे.पी.मॉर्गनच्या इएसजीद्वारे अदानी समूहाच्या एसीसी सिमेंटमध्ये करण्यात आलेली गुंतवणूक विकून टाकली आहे. जे. पी. मॉर्गनने एसीसी सिमेंटमधील ७० हजार शेअर्स विकले आहेत.
जे.पी. मॉर्गन या संस्थेने अदानी समूहाच्या कंपनीत मे २०२१ मध्ये गुंतवणूक केली होती. अदानी समूहात ब्लॅकरॉ इंक डॉएचे बँक एजी फंड मॅनेजमेंट यूनिट, डीडब्ल्यूएस ग्रुप यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक कायम आहे. जे.पी.मॉर्गनच्या आणखी एका फंडने एसीसीमधील १३५० शेअर्स विकले आहेत. अदानी समूहाच्या एसीसी सिमेंटमध्ये ही गुंतवणूक गेल्या वर्षी करण्यात आली होती. सध्या जे.पी. मॉर्गन संस्थेची इएसजीद्वारे अदानी समूहामध्ये गुंतवणूक शिल्लक नाही.
हिंडेनबर्गचा अहवाला २४ जानेवारीला जारी झाला त्यावेळी गौतम अदानी फोर्ब्जच्या जगभरातील श्रीमतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी होते. सध्या गौतम अदानी फोर्ब्जच्या यादीत ३८ व्या स्थानी घसरले आहेत. एका महिनाभरात गौतम अदानींची संपत्ती १५० अब्ज अमेरिकन डॉलर्सने कमी झाली. दरम्यान, जे.पी. मॉर्गन च्या नॉन-इएसजी फंडाकडून अदानी समुहातील गुंतवणूक कायम ठेवली आहे. जे. पी. मॉर्गन इएसजी ग्लोबल कॉर्पोरेट इंडेक्स एक इंटीग्रेटेड इनव्हायरमेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स कॉर्पोरेट बेंचमार्क आहे. याद्वारे गुंतवणूक दर्जा आणि परतावा देणाऱ्या बाजारांना समाविष्ट केले जाते.
अदानींना पुन्हा धक्का!