रायगड – कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे.या पार्श्वभूमीवर काल सोमवारपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
रायगड किल्ल्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.त्यामुळे अनेक पर्यटक रायगड किल्ल्यावर अडकले होते . याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.रायगड किल्ल्याच्या मुख्य दरवाजासोबतच रोपवेचा मार्ग देखील बंद केला आहे. त्यामुळे काल पर्यटकांना माघारी जावे लागले. किल्ल्यावर पायी जाताना लागणारा चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद केला आहे. या किल्ल्याजवळ पोलीस २४ तास बंदोबस्त राहणार आहे.
पुढील काही महिने हा किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.