अण्णाद्रमुकचा पक्षाचा ताबा पलानीसामींकडे

चेन्नई : मद्रास हायकोर्टाने एआयएडीएमकेचे नेते ओ पनीरसेल्वम यांची याचिका फेटाळली. ११ जुलै रोजी पक्षाच्या महापरिषदेच्या ठरावाविरोधात पन्नीरसेल्वम आणि त्यांच्या समर्थकांनी ही याचिका दाखल केली होती. त्यामुळे आता पक्षाचे नवे सरचिटणीस म्हणून ई पलानीसामी यांची निवड करण्यात आली असून अण्णाद्रमुक पक्षाचा ताबा ई. पलानीसामी यांच्याकडे आला आहे.

ओ पनीरसेल्वम यांनी एआयएडीएमकेच्या महापरिषदेची स्थापना आणि पक्षाच्या सरचिटणीसपदी ई पलानीस्वामी यांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

Scroll to Top