Home / News / अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतिदिनी राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतिदिनी राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. आज त्यांच्या सहाव्या स्मृतिदिनी सदैव अटल या त्यांच्या स्मारकाला भेट देऊन राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांनी पुष्पांजली अर्पण केली. याप्रसंगी उप राष्ट्रपती जगदीप धनखड आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.राष्ट्र उभारणीत दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी वाजपेयी नेहमीच जनतेच्या स्मरणात राहतील. भारताच्या विकासाचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करीत राहू,असे मोदी याप्रसंगी बोलताना म्हणाले.

Web Title:
संबंधित बातम्या