निफाड – कोटमगाव- पिंपळगाव बसवंत रस्त्यावर रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.
वनविभागाने घटनास्थळी पोहचून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.
कोटमगावपासून एक किलोमीटर अंतरावर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्या रस्ता ओलांडत होता.त्याचवेळी भरधाव वेगाने जाणार्या अज्ञात वाहनाने या बिबट्याला धडक दिली. या बिबट्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.ही घटना समजताच लासलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. काही वेळातच वनविभागाचे मनमाडचे वनपरिक्षेत्राधिकारी आखाडे, वनपाल भगवान जाधव आणि वनरक्षक विजय दोडे यांनी मृत बिबट्याला शासकीय गाडीने निफाड येथे आणले.