मुंबई- सत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा, अजित पवारांची पाठ सोडत नसून त्यासाठीच २०१४ मध्ये त्यांनी माझे सरकार पाडले होते. असा खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. अजित पवारांनीच काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार पाडून भाजपाच्या राजवटीची मुहुर्तमेढ रोवली असेही ते म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मी सिंचन विभागाला केवळ श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश दिला होता. मी कधीही सिंचन विभागात ७० हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे म्हटले नाही. ती फाईलही माझ्याकडे आली नाही किंवा त्याच्यावर माझी स्वाक्षरीदेखील नाही. मी त्यावर चौकशी लावली नाही. मात्र अजित पवारांनी माझ्या सरकारचा नाहक बळी घेतला. त्यांच्यामुळेच २०१४ मध्ये सरकार कोसळले व नंतर भाजपाचे सरकार राज्यात आले.