मुंबई- सरडा हा रंग बदलतो. काल अजित पवार यांनी सरड्या सारखा रंग बदलला. मी त्यांना सरडा म्हणत नाही पण त्यांच्यामध्ये माणसाचा धर्म दिसत नाही, अशी टीका नाना पटोले यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे. इगतपुरीत एका गरोदर मातेचा मृत्यू झाला. या घटनेचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. अधिवेशन सुरु आहे. पुरवण्या मागण्या मान्य झाल्या आहेत.
आदिवासी भागात रस्ते नाहीत. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. याबाबत आम्ही काँग्रेसने सभागृहात विषय मांडला. पुरवण्या मान्य केल्या, पण एवढा पैसा आणणार कुठून? असा सवाल आम्ही केला. ज्यांच्याकडून पैसे घेता त्यामध्ये आदिवासी देखील आहेत. पण आदिवासी लोकांना सोयी सुविधा काय देता? भाजप केवळ मूठभर लोकांना सोयी सुविधा देत आहेत. सत्तेचा माज जो भाजपला आला आहे. हा माज लोक उतरवणार, असे नाना पटोले म्हणाले.