सिल्लोड – तालुक्यातील अजिंठा परिसरात शेतकर्यांनी शेतातील तण नष्ट व्हावे म्हणून फवारणी केली.मात्र फवारणीनंतरही तण तसेच कायम राहून पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. तणनाशकाबाबत मोठ्या प्रमाणात अशा तक्रारी केल्या जात आहेत.
गेल्या काही दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सातत्याने होत असल्याने पिकांमध्ये तणाचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे शेतकरी तणनाशकांची फवारणी करत आहेत. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात
तणनाशके उपलब्ध असून विक्रेत्यांच्या सल्ल्याने शेतकरी त्याची खरेदी करून फवारत आहेत.मात्र त्याचा तणावर काहीच परिणाम होत नाही.फवारणी करूनही तण तसेच उभे दिसत आहे.उलट तणनाशक फवारल्यामुळे सोयाबीन पीक पिवळी पडले आहे.