अजय जडेजा बनला ‘जामसाहब ‘जामनगर राजघराण्याचा उत्तराधिकारी

जामनगर – गुजरातमधील जामनगरच्या राजघराण्याने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याला या राजघराण्याचा उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. जामसाहब शत्रुशल्यसिंहजी महाराज यांनी जडेजाला आपला वारस जाहीर केल्याने जडेजा आता जामसाहब बनला आहे . ५३ वर्षीय अजय जडेजा हा जामनगर राजघराण्याचा वंशज आहे. त्यांचा जन्म १९७१ मध्ये नवानगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जामनगरमध्ये झाला.शत्रुसल्यासिंहजींचे चुलत बंधू आणि त्यांचे वडील दौलतसिंहजी जडेजा यांनी रात्री उशिरा पत्राद्वारे त्याला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. सध्याचे जामसाहब शत्रुशालीसिंहजी यांना मुले नाहीत.त्यामुळे त्यांनी वारस म्हणून अजय जडेजाची निवड केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top