मुंबई- राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध असलेल्या जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अखेर सुरक्षा अभ्यासाचे छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू करण्यात आले आहे.मागील २० वर्षापासून यासाठी प्रयत्न सुरू होते.या संस्थेवर महाराष्ट्रातून सदानंद मोरे , पांडुरंग बलकवडे आणि पराग मोडक यांची करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी एक कोटी रुपयांचा निधी जेएनयूला दिला होता. मात्र तरीही हे अध्यासन सुरू होऊ शकले नव्हते. तेव्हापासुन जेएनयूमधे सुरक्षा अभ्यासाचे छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरु व्हावे यासाठी प्रयत्न केले जात होते.मात्र आता त्या प्रयत्नांना यश आले आहे. एकूण सहा जणांची या सेंटरचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.यात महाराष्ट्रातील इतिहास संशोधक असलेले सदानंद मोरे,पांडुरंग बलकवडे आणि पराग मोडक या तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे.