मालेगाव – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असताना उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव १८ आणि १९ ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या दौर्यावर येणार आहेत. त्यांच्या दौर्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.१८ ऑक्टोबरला अखिलेश यादव मुस्लिम बहुल मालेगाव विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. १९ ऑक्टोबरला ते धुळ्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. महाराष्ट्रात १८ जागांवर समाजवादी पक्ष विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रचारासाठी अखिलेश यादव यांनी जोरदार कंबर कसली आहे. राज्यात सध्या समाजवादी पक्षाचे दोन आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगरमधून अबू आझमी आणि भिवंडी पूर्वमधून रईस शेख हे सपाच्या तिकिटावर विजयी झाले होते.
अखिलेश यादव शुक्रवारपासून महाराष्ट्राच्या २ दिवसीय दौर्यावर
