मुंबई – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी सरकारने काल न्यायिक आयोग स्थापन केला. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले हे आयोगाचे एकमेव सदस्य आहेत.
यासंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार २३ सप्टेंबर रोजी झालेल्या एन्काउंटरसाठी कोणतीही व्यक्ती, गट किंवा संघटना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे जबाबदार होती का याचा तपास आयोगाने करायचा आहे.
एन्काउंटर झाले त्या दिवशी उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी उचललेली पावले आणि घटनेशी संबंधित सर्व पैलूंची सखोल चौकशी करून आयोगाने निष्कर्ष सादर करायचे आहेत. चौकशी पूर्ण करण्यासाठी आयोगाला तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे.
अक्षय शिंदे एन्काउंटरची चौकशी! न्या.दिलीप भोसले यांचा आयोग
