Home / News / अक्षय शिंदेचा मृतदेह सोमवारपर्यंत दफन करण्याची व्यवस्था करा! हायकोर्टाचे सरकारला आदेश

अक्षय शिंदेचा मृतदेह सोमवारपर्यंत दफन करण्याची व्यवस्था करा! हायकोर्टाचे सरकारला आदेश

मुंबई – बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोप अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचे दफन करण्यासाठी जागा शोधून सोमवारपर्यंत त्याचा दफनविधी पार पडेल...

By: E-Paper Navakal

मुंबई – बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोप अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचे दफन करण्यासाठी जागा शोधून सोमवारपर्यंत त्याचा दफनविधी पार पडेल अशी व्यवस्था करा,असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज सरकारला दिले.
आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करू देण्यास बदलापूर,कळवा आणि अंबरनाथ येथील स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. त्यामुळे अद्याप त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा मिळू शकलेली नाही. आरोपीच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दुसरी याचिका दाखल करून दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारला द्यावेत,अशी मागणी केली.
या याचिकेवर आज न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. एम एम साठ्ये यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.त्याप्रसंगी न्यायालयाने अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारला दिले.त्याचबरोबर दफन संस्कार साधेपणा करा, त्याचे भांडवल करू नका,अशा सूचना न्यायालयाने अक्षय शिंदेच्या कुटुंबियांना दिल्या.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts