नंदूरबार- शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांच्यावर अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.हा गुन्हा खोटा असल्याने अक्कलकुवा आणि खापर गावात व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवून निषेध व्यक्त केला. परिणामी दोन्ही गावांत शुकशुकाट पसरला होता.
आमदार पाडवी आणि भाजपाचे पंचायत समिती सदस्य सुधीर पालवी यांच्यात विकास कामांवरून वादविवाद सुरू होता. मात्र आमश्या पाडवी यांनी सुधीर पालवी आणि त्यांच्या बहिणीला मारहाण करत विनयभंग केला असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली होती. त्यांच्या तक्रारीवरुन खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप व्यापार्यांनी केला. या निषेधार्थ अक्कलकुवा आणि खापर गावातील व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवली.
अक्कलकुवा,खापर गावात पाडवींसाठी व्यापाऱ्यांचा बंद
