मुंबई- रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आता विमा कंपनी सुरू करणार आहेत.त्यासाठी अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने जर्मन कंपनी अलियान्झ सोबत बोलणी सुरू केली आहेत.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस विमा क्षेत्रात प्रवेश करणार आहे. या कंपनीला अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीजपासून वेगळे करण्यात आले आणि शेअर बाजारात लिस्ट करण्यात आले आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस जर्मन कंपनी अलियान्झच्या सहकार्याने सामान्य विमा आणि जीवन विम्याशी संबंधित व्यावसाय करणार आहे. याबाबत दोन्ही कंपन्यांमधील चर्चा अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे.