अंबरनाथमध्ये जखमी पिसोरी हरीण आढळले

ठाणे- अंबरनाथ एमआयडीसीला लागून असलेल्या वनक्षेत्रात दुर्मिळ पिसोरी जातीचे हरीण जखमी अवस्थेत आढळले. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिल्यानंतर वनाधिकारी वैभव वाळिंबे यांनी हरणाला ताब्यात घेऊन पशुवैद्यांच्या मदतीने प्रथमोपचार करून जीवदान दिले.या हरणाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

आज पहाटे रिलायन्स स्टील ट्यूब या कारखान्यात रात्रपाळीवर असणाऱ्या कामगाराला डोंगराजवळ जखमी हरीण दिसले.त्याने ग्रामस्थांच्या मदतीने प्राणीमित्र विनय पवार व वनविभागाशी संपर्क केला. वनपरिमंडळ अधिकारी वैभव वाळिंबे यांनी या हरणास ताब्यात घेऊन उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रायबोळे यांच्याकडे नेले. त्याठिकाणी प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चने यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथे हरणाला दाखल केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top