मुंबई- अंधेरी पूर्व चकाला परिसरात रामबाग सोसायटीमध्ये दरड कोसळली. इमारतीच्या बाजूला असलेल्या डोंगराचा एक भाग कोसळला. त्यामुळे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पाच घरांमध्ये माती शिरली आहे. या अपघातामध्ये ५ घरांचे नुकसान झाले आहे. रामबाग सोसायटीत २३ वर्षे जुनी आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास घरांमधील सर्व नागरिक झोपेत असताना ही दरड कोसळल्याची घटना घडली. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या इमारतीत तब्बल १६५ सदनिका असून अनेक नागरिक या ठिकाही राहत आहे. दरम्यान, या घटनेमुळे रामबाग सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अंधेरी परिसरात दरड कोसळली
