मुंबई – अंधेरी पश्चिम परिसरातील १३ मजली काल रात्री १० वाजताच्या सुमारास आग लागली होती. यामध्ये एका ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
अंधेरी पश्चिम येथील लक्ष्मी इंडस्ट्री इस्टेटच्या लिंक रोड परिसरातील १३ मजली स्काईपैन अपार्टमेंटच्या ११ व्या मजल्याला आग लागली होती. या घटनेत राहुल मिश्रा (७५) व रौनक मिश्रा(३८) या दोन व्यक्तींना श्वास गुदमरल्यामुळे तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान राहुल मिश्रा या वृध्द व्यक्तीचा मृत्यू झाला. तर रौनक मिश्रा या महिलेवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथक व अग्निशमन दल तत्काळ दाखल झाले होते. ही आग इतकी भीषण होती की, सुमारे २ वाजताच्या सुमारास आग विझवण्यास अग्निशमन दलाला यश मिळाले.
मात्र, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.तर, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल या प्रकरणाचा तपास करत आहेत.