कोलकाता – अंदमानच्या समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे २३ ऑक्टोबरला ओडिशा व पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली.या काळात किनाऱ्यालगतच्या भागात मुसळधार पाऊस होईल व सोसाट्याचे वारे वाहतील. पश्चिम बंगाल व ओडिशाच्या मासेमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशाराही देण्यात आला आहे. हवामान विभागाने या संदर्भात एक विशेष पत्रक प्रसारित केले आहे. त्यात म्हटले आहे की, अंदमानच्या जवळच्या समुद्रातील चक्राकार वारा दोन दिवसात चक्रीवादळाचे रुप धारण करेल. हे चक्रीवादळ पश्चिम बंगालला धडकेल त्यानंतर ते उत्तरेकडील ओडिसाला धडकणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असून समुद्रात महाकाय लाटा उसळणार आहेत. या काळात १२० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहणार असून त्यानंतर वाऱ्याचा वेग मंदावेल. या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. उत्तराखंडमध्येही या वादळानंतर तापमान कमी होऊन थंडी सुरु होईल. दिवाळीपर्यंत राजस्थानातून येणाऱ्या वाऱ्यांमुळेही थंडीचा प्रकोप होईल. ला नीनाच्या प्रभावामुळे यंदाचा हिवाळा कडक असेल. उद्यापासून उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग व पिथौरागड जिल्ह्याच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |