लंडन – पृथ्वीवरील सर्वात दुर्गम अशा खंडांपैकी एक असलेल्या अंटार्क्टिकामध्ये गुप्त दरवाजा आढळल्याची चर्चा आहे. गुगल मॅपवर असलेल्या हा फोटो पाहून अनेक लोकांनी वेगवेगळे तर्क मांडले आहेत.बर्फ आणि डोंगरमध्ये असलेला चौकोनी आकारचा हा दरवाजा जपानद्वारे चालवल्या जाणाऱ्या शोवा स्थानकाच्या आग्नेय दिशेला आहे. “६९°००’५०”एस ३९°३६’२२”ई,” या (गुगल मॅप) लोकेशन कोऑर्डिनेट्सवर एका वापरकर्त्याला हा दरवाजा सापडला असल्याचे त्याने सांगितले. त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अंटार्क्टिकातील भव्य दरवाजा? असे लिहिले. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर लंडनमधील इम्पीरियल कॉलेजचे प्राध्यापक मार्टिन सिगर्ट यांनी सांगितले की, बर्फाच्या नैसर्गिक हालचालींमुळे म्हणजेच वारा, वितळणारा बर्फ आदींमुळे दरवाजासारखी आकृती तयार झाली आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला असलेला बर्फ वाऱ्याची दिशा दर्शवत आहे. त्यात असामान्य काहीही नाही, ही केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
अंटार्क्टिकामध्ये गुप्त दरवाजा? सोशल मीडियावर फोटो व्हायरल
