अंगणवाडी सेविकांचे उद्यापासून आझाद मैदानात उपोषण सुरू

मुंबई- वेतनवाढीची अंमलबजावणी रखडल्याने राज्यातील संतप्त अंगणवाडी सेविकांनी उद्यापासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. उद्या सकाळी १० वाजल्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांच्या समितीमधील ७ घटक संघटनांचे २५ नेते बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी रोज १५० अंगणवाडी कर्मचारी २४ तासांच्या साखळी उपोषणाला बसणार आहेत. तर २५ सप्टेंबर रोजी जेलभरो आंदोलन करणार आहेत.
राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना ३ हजार, मदतनिसांना २ हजार वेतनवाढ देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विकास विभागाने घेतला होता. या निर्णयाला वित्तविभागाने वेतनवाढीच्या प्रस्तावाला मान्यताही दिली होती. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत वेतनवाढीची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार असल्याचा निर्धार अंगणवाडी सेविकांच्या समितीने घेतला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top