आज केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांचा वाढदिवस. जन्म.१२ जून १९५७ मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील पोर्सा विकासखंड अंतर्गत ओरेठी गावी. नरेंद्र सिंह तोमर एक उत्तम नेता तसेच कुशल रणनीतिकार म्हणूनही परिचित आहेत.
त्यांचे वडील मुंशी सिंग तोमर शेतकरी होते. पदवी दरम्यान ते महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. शिक्षण संपल्यानंतर ते ग्वाल्हेर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर ते राजकारणात पूर्णपणे सक्रिय राहिले. १९७७ मध्ये ते भारतीय जनता युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष झाले.
ते २००९ मध्ये पहिल्यांदा राज्यातील मुरैना संसदीय मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले होते. यापूर्वी ते राज्यातील राज्यसभेचे सदस्य होते. २०१९ मध्ये तोमर ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडले गेले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चात विविध पदे भूषविताना १९९६ मध्ये त्यांनी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले. तोमर १९९८ मध्ये ते प्रथमच ग्वाल्हेरमधून आमदार म्हणून निवडून गेले आणि २००३ मध्ये दुसर्यां९दा याच मतदारसंघातून निवडणूक जिंकली. या दरम्यान ते उमा भारती, बाबूलाल गौर आणि शिवराजसिंह चौहान मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाच्या विभागांचे मंत्रीही राहिले होते.
२००८ नरेंद्र सिंह तोमर यांना उत्कृष्ट मंत्री म्हणून पुरस्कार मिळाला आहे. २००८ साली तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी त्यांना हा सन्मान दिला होता. तोमर यांची २००८ साली भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली आणि त्यानंतर जानेवारी २००९ मध्ये ते राज्यसभेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडले गेले. नंतर त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम पाहिले. तोमर यांना पुन्हा एकदा डिसेंबर २०१२ रोजी परत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले गेले. सध्या मोदी सरकार मध्ये कृषीमंत्री पद संभाळणारे नरेंद्रसिंह तोमर कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून चर्चेत आहेत.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३