संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

गुंतवणूकदारांना १०० टक्के परतावा देणारी मोल्ड टेक पॅकेजिंग कंपनी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पॅकेजिंग क्षेत्रात देशभर पोहोचलेल्या मोल्ड टेक पॅकेजिंग कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या वर्षभरात १०० टक्के परतावा दिला आहे. तसेच येत्या काळात या कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

पेंट, वंगण एफएमजी आणि खाद्य उद्योग क्षेत्रातील कंपन्यांसाठी ही कंपनी पॅकेजिंगचे काम करते. या कंपनीच्या शेअरर्समध्ये गेल्या वर्षभरात 115 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मात्र सध्या शेअर मार्केटमध्ये दबाव असल्याने या कंपनीचे शेअर्सही आठ टक्क्यांनी घसरले आहेत. परंतु ही परिस्थिती लवकरच सुधारेल असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

या आठवड्यात शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा कंपनीच्या शेअर्समध्ये १.८० टक्क्यांनी घसरले होते. तेव्हा या शेअर्सची किंमत ७२५.७० रुपयांवर आला होता. मात्र येत्या तीन वर्षांपर्यंत या शेअरमध्ये तेजी राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

पॅकेजिंग क्षेत्रातील ही कंपनी अद्यावत कंपनी असून सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान या कंपनीकडे आहे. स्वतःच्या मालकीचे अद्यावत असे इन-हाउस टूल रूम, डिझाईन स्टुडिओ, रोबोट मॅन्युफॅक्चरिंग आणि लेबल मेकिंग या सारख्या सुविधा या कंपनीमध्ये आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami