संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

दिनविशेष! जगविख्यात मुष्टियोद्धा माईक टायसन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जगविख्यात मुष्टियोद्धा माईक टायसनचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म ३० जून १९६६ रोजी झाला. अमेरिकेचा दिग्गज मुष्टियोद्धा माईक टायसन १५ वर्षानंतर व्यावसायिक रिंगणात उतरणार आहे. एका चॅरिटी लढतीसाठी त्याने तयारी सुरू केली आहे. १९८० च्या दशकात या खेळावर वर्चस्व गाजविणाऱ्या ५३ वर्षांच्या माईक टायसनने २००५ ला अखेरची प्रतिस्पर्धी लढत खेळली. केविन मॅकब्राईडविरुद्ध खेळल्यानंतर २० वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीला त्याने पूर्णविराम दिला होता. ५० पैकी ४४ लढती जिंकणाºया टायसनला ‘ऑल टाइम ग्रेट बॉक्सर’ संबोधले जाते. शिवाय त्याला या ग्रहावरील सर्वांत ‘विक्षिप्त माणूस’ असेही संबोधले गेले आहे.

तसेच टायसन हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ याच्यासोबत एका चित्रपटात काम करणार आहे. त्यासाठी प्रमोशन सुरू झाले असून टायसनने जो व्हिडिओ शूट केला त्यात स्वत:ला सर्वांत वाईट मुलगा असे कॅप्शन लिहिले. ‘जगातील सर्वात वाईट मुलगा’ असे त्याने लिहिले असून ट्रेनरसोबत तो सराव करताना दिसत आहे. अवघ्या चार सेकंदात त्याने सहा पंच मारले. टायसनच्या पॉवरफुल पंचपुढे ट्रेनरचा टिकाव लागला नाही. ते ‘नॉकआऊट’ झाले. अलीकडे इन्स्टाग्राम ‘लाईव्ह चॅट’मध्ये बोलताना टायसनने मागच्या आठवड्यापासून आपण ‘ग्लोव्ह्ज’सह सराव करीत असल्याचे म्हटले होते. माझे शरीर मोठे झाले असून पंच मारणे कठीण होत असल्याची कबुली दिली होती. शरीर पिळदार करण्यासाठी टायसनला जिममध्ये जायचे आहे. ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही, अशांना मदत करण्यासाठी तो पुन्हा रिंगणात उतरणार आहे. चार-पाच राऊंड लढत देण्यासाठी शरीरावर मेहनत घेण्याचा त्याचा निर्धार आहे.

एकेकाळी महंमद अली लोकांच्या मनात ठासून भरला होता . पण टायसनचे व्यत्तिमत्त्व सर्वसामान्यांना आकषून गेले ते त्याच्या वादगस्त कारकीर्दीमुळे . पाच फूट ११ इंच उंचीची रासवट शरीरयष्टी. बारीक डोळे. खालून वर निमिषार्धात पंच मारण्याचे कसब व व्यक्तिमत्त्वात असणारी मगरूरता या गुणांमुळे टायसन जगाचा हिरो होता. त्याच्या हिरो बनण्याला कारणेही तशीच होती. अमेरिकेतील कृष्णवर्णीय समाजाचा
अस्थिरतेचा जो काळ होता त्या काळात टायसनचा उदय झाला होता. जन्मजात गरिबा पोट भरण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग अशा परिस्थितीत लहानग्या त्यांच्या नावावर मारहाण, दंगल व चोरीचे अनेक गुन्हे होते . त्याला तेराव्या वर्षीच शाळेतून काढून टाकण्यात आले होते . पीळदार शरीर १३ व्या वर्षी त्याचं वजन २०० पौंड होतं. वागण्यात खुनशीपणा जगण्यातील बेफिकीरपणा न्यूयॉर्क शहरातील कोणा हुशार माणसाच्या लक्षात आला नसेल तर ती अमेरिका कसली? अमेरिकेत कोणत्या गुणांचं कधी कोणाचे चीज होईल हे काही सांगता येत नाही. टायसनचे हेच गुण ‘गस डी अमेटो’ या बॉक्सिंग प्रशिक्षिकाने हेरले आणि बॉक्सिंग विश्वात टायसन नावाचं वादळ जन्म घेऊ लागलं. गस डी अमेटोने टायसनला बाक्सिंगचं उत्कृष्ट पशिक्षण दिलं . पण टायसन १९८४ च्या ऑलिम्पिकसाठी अमेरिकेच्या संघात मात्र पवेश घेऊ शकला नाही.

टायसनने व्यावसायिक बॉक्सिंगचं जग आपलंसं केलं. पहिल्या १८ महिन्यांत त्याने २७ विजय मिळवले. २७ मधील २५ विजय नॉक आऊट होते . पुढे हेवीवेट अजिंक्यपदाच्या लढतीत टेव्हर बसिकला दोन फेऱ्यात लोळवलं आणि केवळ २० व्या वर्षी वर्ल्ड हेवीवेट चम्पिअनचा किताब मिळवून जगाच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाची मोहर उटविली. अप्परकट्स व हुक्समध्ये प्रभुत्व असलेल्या टायसनने त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला टायसनने लोळवलं . त्याने जेम्सा बोन फीशर’ स्मिथला केवळ सहा मिनिटात हरवून विजेतेपद मिळविलं. १९८७ साली टोनी ट्करला पराभूत करून बॉक्सिंगमधील अनिमिषित्त रामाट अशी आपली प्रतिमा बनविली. त्याच सुमारास त्याचे जीवन मात्र मोडकळीस येण्यास सुरुवात झाली. पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर टायसनच्या खेळातील जादू ओसरू लागली.

१९९० मध्ये जेम्स ‘बस्टर’ डग्लसने त्याला १० व्या फेरीत लोळवलं. १९९२ मध्ये अमेरिका सुंदरी स्पर्धेतील डिझेरी वॉशिंग्टन या युवतीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला. हा आरोप शाबीत झाल्याने त्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली. तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर टायसनच्या खेळात क्रुरपणा येऊ लागला . एव्हडर होलीफिल्डच्या कानाचा चक्क चावा घेऊन त्यानं आपल्यातील खुनशीपणा जगजाहीर केले . हेवीवेट चॅम्पियन नशा त्याच्या मनातून उतरत नव्हती . बॉक्सिंग रोजचं व्यावसायिक जग त्याला त्याचे खाजगी जग वाटत असे. सलग ३७ नॉक आऊटची झिंग झगमगाट होणारे सट्टेवाल्यांचा पैसा, इग्ज, बायका व पचंड अनिश्चितता अशा वातावरणात टायसन त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. लासवेगासच्या बॉक्सिंगचे फड व बॉक्सिंग रिंग वर पडणारे ग्लॅमर प्रखर झोत सट्टेवाल्यांचा पैसा, ड्रग्ज, बायका व पचंड अनिश्चितता अशा वातावरणात टायसन दिवसेंदिवस अस्वस्थ होत होता . कोर्टकचेऱ्यानी तर त्याच्यातील जिगर कमी केली होतीच पण त्याला दिवाळखोरी बनवून टाकले होते. अशा परिस्थितीतही हा एकेकाळचा अजिंक्यसमाट आपल्या अस्तित्वासाठी धडपडत होता. पण २००४ साली त्याला डॅनी विल्यम्सने लोळवलं. त्यानंतर त्याच्यातील सातत्य कमी झालं आणि ११ जून २००५ साली केविन मॅकबाईडकडून मार खाल्ल्यानंतर त्यानं आपण बॉक्सिंग करण्याच्या योग्यतेचे नाही असं जाहीर करून टाकलं. वडिलांच्या वयाच्या बॉक्सरलाही आपण लोळवू शकत नाही अशी कबुली देत अनभिषित्त समाटाने बॉक्सिंग विश्वाचा कायमचा निरोप घेतला. १९८४ ला वयाच्या २० व्या वर्षी ट्रॅव्हर बार्बरिक याचा विक्रम मोडित काढणाºया टायसनच्या नावावर ‘हेविवेट चॅम्पियन’ हा विक्रम कायम आहे.

संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami