Zhapuk Zhupuk Movie : सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली? पाहा आकडेवारी

Zhapuk Zhupuk Box Office Collection

Zhapuk Zhupuk Box Office Collection | ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता आणि रीलस्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan) आता मोठ्या पडद्यावर आपले नशीब आजमावत आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ (Zapuk Zupuk Movie) हा त्याचा पहिला चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित झाला. या कौटुंबिक करमणुकीच्या सिनेमाने पहिल्याच दिवशी संथ सुरुवात केली असली तरी वीकेंडमध्ये कमाईत मोठी उडी घेण्याची शक्यता आहे.

‘झापुक झुपूक’ सिनेमाच्या प्रदर्शनाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होती. सूरजच्या चाहत्यांनी सिनेमाच्या ट्रेलरनंतर आणि गाण्यांनंतर सोशल मीडियावरही चांगली हवा तयार केली होती. अनेक रील व्हिडीओ व्हायरल झाले होते, आणि थिएटरमध्ये प्रेक्षक गाण्यांवर थिरकत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सिनेमाने पहिल्या दिवशी देशांतर्गत (Zhapuk Zhupuk Box Office Collection) 24 लाख रुपयांची नेट कमाई केली, तर जागतिक स्तरावर 27 लाख रुपयांचा गल्ला जमवला. Sacnilk ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. चित्रपटात सूरजसोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, मिलिंद गवळी आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘झापुक झुपूक’ची घोषणा केदार शिंदे यांनी ‘बिग बॉस मराठी 5’च्या ग्रँड फिनाले दरम्यान केली होती. रिलीजआधीच या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली होती. हा सिनेमा एक हटके प्रेमकथा सादर करतो, ज्यात रोमांस, अॅक्शन आणि ड्रामा यांचा सुरेख मिलाफ आहे.

दरम्यान, याच दिवशी प्रदर्शित झालेला दुसरा मराठी चित्रपट ‘देवमाणूस’ (Devmanus Movie) देखील अपेक्षेप्रमाणे मोठी कमाई करण्यात कमी पडला आहे. ‘देवमाणूस’ने पहिल्या दिवशी 15लाख रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे. ‘झापुक झुपूक’ आणि ‘देवमाणूस’ या दोन्ही चित्रपटांना बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांशी (Box Office Competition) तगडी स्पर्धा करावी लागत आहे. ‘ग्राउंड झीरो’, ‘थुडरुम’, ‘फुले’, ‘केसरी चॅप्टर २’, ‘जाट’ अशा चित्रपटांच्या प्रदर्शनामुळे मराठी चित्रपटांच्या कमाईवर परिणाम झाल्याचे दिसते.