Janhvi Kapoor receives Gift from Ananya Birla | बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या एका खास आणि महागड्या गिफ्टमुळे चर्चेत आहे. तिची जवळची मैत्रीण आणि प्रसिद्ध उद्योजिका अनन्या बिर्ला (Ananya Birla) हिने तिला तब्बल 4 ते 5 कोटी रुपये किंमतीची लॅव्हेंडर रंगाची Lamborghini Huracan Evo Spyder भेट म्हणून पाठवली आहे.
आकर्षक रंगाच्या या आलिशान गाडीने (Luxury car gift) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गाडीवार “With love, Ananya Birla.” असे लिहिण्यात आले आहे. ही गाडी जान्हवीच्या मुंबईतील निवासस्थानी दाखल झाली आणि बघ्यांच्या नजरा खिळल्या.
जरी जान्हवी कपूरने या भेटीबद्दल सार्वजनिकरित्या काहीही सांगितलेले नसले तरी, ही भेट अनन्या बिर्लाकडून तिच्या आगामी व्यावसायिक सहकार्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता असल्याचे बोलले जात आहे.
अनन्या बिर्ला कोण आहे?
अनन्या बिर्लाचा जन्म 17 जुलै, 1994 रोजी झाला. ती एक यशस्वी उद्योजिका आणि गायिका म्हणून प्रसिद्ध आहे. अनन्या प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांची कन्या आहे.
वयाच्या 29 व्या वर्षी, अनन्याने ‘स्वतंत्र मायक्रोफिन’ची स्थापना केली, ज्याद्वारे भारतातील ग्रामीण महिलांना सूक्ष्म वित्तपुरवठा करून सक्षम बनवण्याचे काम केले जाते. तिने ‘इकाई असाई’ नावाचा एक लक्झरी डिझाइन लेबल देखील सुरू केला आहे आणि मानसिक आरोग्य जागरूकता आणि समर्थनाशी संबंधित ‘एमपॉवर’ या उपक्रमात सह-संस्थापक म्हणून काम केले आहे.
नन्याने 2016 मध्ये संगीत क्षेत्रात पदार्पण केले आणि लवकरच त्या प्रसिद्ध मिळवली. तिची अनेक गाणी लोकप्रिय आहेत.
इतकी महागडी भेट का?
रिपोर्टनुसार, ही शानदार भेट एका नवीन व्यावसायिक उपक्रमाशी संबंधित आहे. अनन्या बिर्ला कथितरित्या स्वतःचा सौंदर्य किंवा परफ्यूम ब्रँड लाँच करण्याच्या तयारी आहे व यासाठी जान्हवी कपूर या ब्रँडचा प्रमुख चेहरा असेल. आगामी व्यावसायिक भागीदारीची सुरुवात म्हणून गाडी भेट दिल्याचे सांगितले जात आहे.