Chhava OTT Release | छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) पराक्रमावर आधारित अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘छावा’ (Chhava) चित्रपट आता प्रेक्षकांना OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. सज्ज झाला आहे. 11 एप्रिलपासून ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix वर हा चित्रपट उपलब्ध आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सने (Maddock Films) निर्मिती केलेला ‘छावा’ 14 फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलेल्या या चित्रपटाला आता Netflix (Netflix) वर जगभरातील प्रेक्षक पाहू शकणार आहेत.
या चित्रपटात विकी कौशलसोबत रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna), अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. Netflix ने सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत लिहिले – “आले राजे आले! पाहा शौर्य आणि पराक्रमाची ही काळजाला भिडणारी कथा. ‘छावा’ आजपासून Netflix वर.”
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल बोलताना विकी कौशलने सांगितले, “ही भूमिका माझ्या आयुष्यातील सर्वांत सन्माननीय अनुभवांपैकी एक ठरली आहे. त्यांचे शौर्य आणि इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे भाग्य मला लाभले. नेटफ्ल्किसमुळे आता ही कथा जगभर पोहोचेल.”
दरम्यान, ‘छावा’ने भारतात 599 कोटी रुपयांची कमाई केली असून, शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) चित्रपटालाही मागे टाकले आहे. जागतिक स्तरावर ‘छावा’ने एकूण 804 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.