KGF 3 : रॉकी भाईच्या ‘KGF यूनिव्हर्स’मध्ये होणार ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

KGF 3 | अभिनेता यशची प्रमुख भूमिका असलेल्या KGF’ चित्रपटांच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. चाहते अनेक दिवसांपासून KGF 3 ची वाट पाहत आहेत. या चित्रपटाबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नसली तरीही आता पुन्हा एकदा याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

‘KGF’ यूनिव्हर्समध्ये प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमारची एन्ट्री होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ‘गुड बॅड अगली’ (Good Bad Ugly) चित्रपटातील एका संवादामुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत.

‘केजीएफ’ फ्रँचायझीचे दिग्दर्शक प्रशांत नील (Prashanth Neel) आणि अभिनेता यश (Yash) यांच्यासोबत अजित स्क्रिन शेअर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला जात आहे की, अजित आणि नील हे दोन चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. यातील एक चित्रपट ‘KGF’ युनिव्हर्सचा भाग असू शकतो.


ही अफवा पसरवण्यामागे कारण आहे 10 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गुड बॅड अगली’ (GBU) या चित्रपटातील एक संवाद. चित्रपटातील मुख्य पात्राने “व्हायोलन्स, व्हायोलन्स, आय लव्ह व्हायोलन्स” या ‘KGF Chapter 2’ मधील यशच्या गाजलेल्या संवादासारखाच डायलॉग म्हटल्यामुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत.

फॅन-मेड पोस्टर

या चर्चेला आणखी जोर मिळाला जेव्हा थालाचा (Thala Ajith) एक फॅन-मेड पोस्टर व्हायरल झाले. एका चाहत्याने ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर थेट लिहिले की अजित ‘KGF 3’ साठी फायनल झाले आहेत. या पोस्टमध्ये लिहिलंय, “अधिकृत: थाला अजित ‘KGF Universe’ मध्ये सहभागी झाले आहेत. 2027 मध्ये हा चित्रपट पाहायला मिळेल.

एवढेच नाही तर या चित्रपटात अजित खलनायकाची भूमिका साकारू शकतात, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ‘KGF 3’ अद्याप अधिकृतरीत्या घोषित झालेला नसला तरी सोशल मीडियावर #KGF3 हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.