लवकरच प्रतीक्षा संपणार! ‘या’ तारखेला रिलीज होणार आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ चित्रपट

Sitaare Zameen Par Movie | बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतत आहे. त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सितारे जमीन पर’ (Sitaare Zameen Par) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रिपोर्टनुसार, आमिरचा हा नवीन चित्रपटट २० जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. आर.एस. प्रसन्ना (RS Prasanna) दिग्दर्शित हा चित्रपट ‘तारे जमीन पर’चा सिक्वेल आहे. आणि यावेळी तो अपंगत्व या विषयाला एका नव्या आणि हृदयस्पर्शी कथानकातून मांडणार आहे.

रिपोर्टनुसार, चित्रपटाचे एडिटिंग पूर्ण झाले असून आमिर आता त्याच्या प्रमोशनल स्ट्रॅटजीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे. “आमिर जून महिन्यातील मोकळ्या कालावधीचा फायदा घेण्याचा विचार करत आहे. सुरुवातीला त्याने 30 मे रोजी प्रदर्शनाचा विचार केला होता, पण 20 जूनची तारीख त्याला बॉक्स ऑफिसवर दोन आठवड्यांचा मोकळा कालावधी देईल.

आमिरला ‘सितारे जमीन पर’च्या (Emotional Drama) कथानकावर पूर्ण विश्वास आहे. हा चित्रपट हास्य, भावना आणि नाट्य या त्याच्या यशस्वी फॉर्म्युल्यावर आधारित आहे. त्याने प्रदर्शनासाठी योग्य कालावधी शोधला असून 20 जून ही तारीख निश्चित केली आहे. या सामाजिक नाटकाच्या संपूर्ण विपणन योजनाही तयार आहे.”

ट्रेलर मे महिन्यात येणार

चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे मे महिन्यात चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. आमिरने यासाठी स्मार्ट मार्केटिंग योजना आखली आहे. ट्रेलर तयार असून आमिर तो ‘रेड 2’ (Raid 2) चित्रपटासोबत लाँच करण्याची शक्यता आहे. थिएटरमध्ये जाणाऱ्या प्रेक्षकांना थेट प्रदर्शनाची तारीख सांगण्याचा हा प्लॅन आहे.

जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) या चित्रपटातून मुख्य प्रवाहातील सिनेमात पुनरागमन करत आहे. हा तिचा आमिर खानसोबतचा पहिलाच चित्रपट असेल. ‘सितारे जमीन पर’द्वारे आमिर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला एक सुंदर कथा घेऊन येणार आहे.

दरम्यान, आमिर खानच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर ‘सितारे जमीन पर’ व्यतिरिक्त, आमिर सध्या राजकुमार संतोषी यांच्यासोबत एका कॉमेडी चित्रपटासाठी आणि लोकेश कनगराज यांच्यासोबत सुपरहिरो चित्रपटासाठी चर्चा करत आहे. दरम्यान, तो ‘लाहोर: 1947’ या चित्रपटाची निर्मिती करत आहे, ज्यामध्ये सनी देओल मुख्य भूमिकेत आहे आणि हा चित्रपट 2025 च्या शेवटी प्रदर्शित होणार आहे.