रॉयल एनफिल्डच्या बाइक्स भारतीय ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. आता कंपनीने ग्राहकांसाठी Royal Enfield Scram 440 बाइक लाँच केली आहे. कंपनीने या बाइकला दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केले आहे. बाइकमध्ये 443cc, सिंगल-सिलेंडर, एयर आणि ऑयल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. Royal Enfield च्या या बाइकविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Royal Enfield Scram 440 ची किंमत
कंपनीने Royal Enfield Scram 440 बाइकला ट्रेल आणि फोर्स या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. ट्रेल व्हेरिएंटची किंमत 2,08,000 रुपये आणि फोर्स व्हेरिएंटची किंमत 2,15,000 रुपये आहे. ट्रेल व्हेरिएंटमध्ये स्पोक व्हील आणि ट्यूब टायर दिले आहेत. फोर्स व्हेरिएंट एलॉय व्हीलसह ट्यूबलेस टायरसह येते.
Royal Enfield Scram 440 चे स्पेसिफिकेशन्स
रॉयल एनफिल्ड स्क्रॅम 440 मध्ये आधुनिक डिझाइनसह येणारे एलईडी हेडलॅम्प, नव्या सीट आणि पातळ टेल सेक्शन देण्यात आले आहे. बाइकचे फ्युएल टँक आधीपेक्षा मोठे वाटते. यामध्ये डिझाइन जवळपास रॉयल एनफिल्ड स्क्रॅम 411 प्रमाणेच आहे. या बाइकमध्ये 19 इंचाचे फ्रंट व्हील आणि 17 इंचाचे रियर व्हील दिले आहेत.
रॉयल एनफिल्डच्या या बाइकमध्ये 15 लिटरचे फ्युएल टँक दिले आहे. याच्या सीटची उंच 795 मिमी, तर ग्राउंड क्लीअरन्स 200 मिमी आहे. फीचर्सबद्दल सांगायचे तर यात नवीन इंस्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. तसेच, USB चार्जिंग पोर्ट, ट्रिपर नेव्हिगेशन पॉड आणि राउंड रिअर व्यू मिरर दिले आहे.
इंजिनबद्दल सांगायचे तर यामध्ये 443cc, सिंगल-सिलेंडर, एयर आणि ऑयल-कूल्ड इंजिन दिले आहे, जे 6-स्पीड गियरबॉक्ससह येते. हे इंजिन 6,250rpm वर 25.4PS पॉवर आणि 4,000rpm वर 34Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, SOHC वॉल्वट्रेनमध्ये सुधारणा करून नॉइस, वायब्रेशन आणि हार्शनेस (NVH) लेव्हल कमी करण्यावर काम केले आहे. ज्यामुळे गाडी चालवताना चांगला अनुभव मिळेल.
बाइकमध्ये सस्पेन्शनसाठी 41mm टेलिस्कोपिक फोर्क (190mm व्हील ट्रॅव्हलसह) आणि मोनोशॉक (180mm व्हील ट्रॅव्हलसह) दिले आहेत. बाइकच्या दोन्ही व्हेरियंट्समध्ये एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि LED हेडलाइट स्टँडर्ड फीचर्स मिळतील.