चॅम्पियन्स ट्रॉफीआधीच आयसीसी वनडे रँकिंगमध्ये मोठा बदल, पाकला मोठा फटका; भारत कितव्या क्रमांकावर?

ICC ODI Ranking : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी आयसीसी वनडे रँकिंगमध्ये मोठा बदल झाला आहे. नुकत्याच झालेल्या ट्राय-सीरिजच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव केला आहे. या विजयाचा न्यूझीलंडला वनडे रँकिंगमध्ये फायदा झाला आहे.

ट्राय-सिरीज जिंकल्यानंतर न्यूझीलंडच्या आयसीसी वनडे रँकिंगमधील रेटिंग 100 वरून 105 झाली, त्यामुळे संघ रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. अंतिम सामना गमावल्याचा फटका पाकिस्तानसा बसला आहे. पाकिस्तान या लिस्टमध्ये 107 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.

याशिवाय,   ट्राय-सिरीजव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेविरुद्ध 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर त्यांचे रेटिंग 110 झाले आहे. या पराभवामुळे विश्वविजेता संघ असलेला ऑस्ट्रेलिया सध्या दुसऱ्या स्थानावर आहे.

तर दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाने वनडे मालिकेत इंग्लंडचा 3-0 ने पराभव केला. याचा फायदा रेटिंगमध्ये झाला आहे. भारतीय संघ आयसीसी वनडे रँकिंगमध्ये  रेटिंगसह संघ पहिल्या स्थानावर कायम आहे.

एकीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. हायब्रिड मॉडेल अंतर्गत ही स्पर्धा खेळली जाणार आहे. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीआधीच या स्पर्धेचा मुख्य आयोजक असलेल्या पाकच्या संघाला आयसीसी वनडे रँकिंगमध्ये फटका बसला आहे. 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून, 9 मार्चला अंतिम सामना पार पडेल.