क्रिकेटपटू मोहम्मद सिराज सोबत नाव जोडले गेलेली माहिरा शर्मा कोण आहे?

Mahira Sharma : भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) सध्या चर्चेत आहे. सिराजला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नसले तरीही वेगळ्या कारणांमुळे तो चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे नाव दिग्गज गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसलेसोबत जोडले गेले होते. मात्र, नंतर या सर्व अफवा असल्याचे समोर आले. त्यानंतर आता सिराजचे नाव अभिनेत्री माहिरा शर्मासोबत जोडले गेले आहे.

मोहम्मद सिराज हा माहिरा शर्माला डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. दोघेही एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो देखील करतात. माहिरा शर्माने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताच मोहम्मद सिराजने लाईक केले.यानंतरच सोशल मीडियावर मोहम्मद सिराज आणि माहिरा शर्मा यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे  माहिराच्या आईने मात्र दोघं एकमेकांना डेट करत नसल्याचे म्हटले आहे.

कोण आहे माहिरा शर्मा?

माहिरा टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय चेहरा आहे. बिग बॉस-13 मध्येही ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तिचा जन्म 25 नोव्हेंबर 1997 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये असून, ती एक मॉडेल आणि अभिनेत्री आहेत. तिने हिंदी आणि पंजाबी इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे. याशिवाय, 50 हून अधिक संगीत अल्बम्समध्ये काम केले आहे.

माहिराने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’, ‘यारो का टशन’, ‘नागिन 3’ आणि ‘कुंडली भाग्य’ या सीरियलमध्ये काम केले आहे. याशिवाय, बिग बॉस-13 मध्येही ती सहभागी झाली होती.