Instagram New App: अमेरिकेत शॉर्ट व्हीडिओ अॅप टिकटॉक (TikTok) आणि एडिटिंग अॅप कॅपकटवर (Capcut) बंदी घालण्यात आली होती. या संधीचा फायदा घेत इंस्टाग्रामकडून नवीन व्हीडिओ एडिटिंग अॅप लाँच करण्यात आले आहे. इंस्टाग्रामने क्रिएटर्ससाठी खास Edits नावाचे अॅप लाँच केले आहे.
क्रिएटर्सला आता व्हीडिओ एडिट करण्यासाठी कोणत्याही इतर अॅप ची मदत न घेण्याचीगरज नाही. इंस्टाग्रामने Edits नावाने आपले स्वतःचे व्हिडिओ एडिटिंग अॅप लाँच केले आहे. सध्या हे अॅप आयओएस अॅप स्टोरवर प्रीबुकिंगसाठी उपलब्ध आहे. तर लवकरच प्ले स्टोरवर देखील डाउनलोडसाठी उपलब्ध होईल.
इंस्टाग्राम (Instagram) हेड एडम मॉसेरी यांनी सोशल मीडियावरून या अॅपची माहिती दिली. त्यांनी व्हीडिओ शेअर करत लिहिले की, आम्ही नवीन अॅप Edits ची घोषणा करत आहोत. जे यूजर्स व्हीडिओ तयार करतात, त्यांना याचा फायदा होईल. क्रिएटर्ससाठी सर्वोत्तम टूल्स उपलब्ध केले जावेत, यासाठी आमचा प्रयत्न असेल.
Edits अॅपमध्ये मिळतील अनेक फीचर्स
Edits अॅपमध्ये यूजर्सला अनेक शानदार फीचर्स मिळणार आहेत. यूजर्स कोणत्याही वॉटरमार्कशिवाय 1080p रिझॉल्यूशनसह येणारे व्हीडिओ एक्सपोर्ट करू शकतील. यामध्ये एआय अॅनिमेशन, ग्रीन स्क्रीन रिमूव्हर, ओव्हरले, साउंड आणि वॉइस इफेक्ट्स, कस्टमाइजेबल कॅप्शन सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, व्हीडिओच्या कामगिरीची माहिती देणारा अॅनॅलिटिक्स डॅशबोर्ड देखील यात मिळेल.