Home / मनोरंजन / वारणेचे पाणी वाढत चालल्याने भेंडवडेतील १०२ कुटुंबांचे स्थलांतर

वारणेचे पाणी वाढत चालल्याने भेंडवडेतील १०२ कुटुंबांचे स्थलांतर

कोल्हापूर- जिल्ह्यातील संततधार पावसामुळे वारणा नदीने रौद्ररूप धारण केले आहे.नदीचे पाणी झपाट्याने वाढत चालले असून संभाव्य पूरस्थितीमुळे नदीकाठच्या भेंडवडे गावातील...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

कोल्हापूर- जिल्ह्यातील संततधार पावसामुळे वारणा नदीने रौद्ररूप धारण केले आहे.नदीचे पाणी झपाट्याने वाढत चालले असून संभाव्य पूरस्थितीमुळे नदीकाठच्या भेंडवडे गावातील १०२ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

भेंडवडे गावातील स्थलांतरित कुटुंबांपैकी ३५ कुटुंबे गावातील शासकीय विद्यामंदिरमध्ये आहेत. काहींनी तालुक्यातील इतर गावातील आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्य केले आहे.गावातील ९७ जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे. या गावातील मंजनवली पिराच्या दर्ग्याजवळ पाणी आल्याने पेठ वडगावला जोडणारा मार्ग बंद झाला आहे.शेकडो एकर शेतजमीनही या नदीच्या पाण्याखाली गेली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या