‘… तर मनसे तीव्र आंदोलन करणार’, मराठी भाषेच्या मुद्यावर राज ठाकरेंची बँक असोसिएशनला पत्र

Raj Thackeray

Raj Thackeray | गेल्याकाही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा तापला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) राज्यातील सर्व बँकांमध्ये मराठीचा वापर करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेक बँकांना भेट देत, तेथील अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात मागणी केली होती. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी इंडियन बँक असोसिएशनला पत्र लिहिले आहे.

मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्यात यावा यासंदर्भात मनसेचे (MNS) नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी इंडियन बँक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुलकुमार गोयल यांची भेट घेतली.

याबाबत माहिती देताना बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, आरबीआयने काही नियम आखून दिले आहेत. यात मराठी भाषेचा वापर बँकेच्या नियमित कामसाठी करावा असे म्हटले आहे. त्यामुळे बँकेत आमचे काही कार्यकर्ते गेल्यामुळे तेथील काही अधिकाऱ्यांनी उद्दामपणा करत बोलले, त्यामुळे आम्ही बँक असोसिएशनच्या डायरेक्टरची वेळ घेतली.

हे डायरेक्टर भारतभर काम करून आल्यामुळे त्यांना विविध भाषांची ज्ञान आहे. या बँकेचे अध्यक्ष अतुल कुमार गोयल यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज साहेबांनी बँकेच्या मराठी भाषा वापरण्यास संबंधित काढलेले पत्र देण्यात आले, असल्याचे सांगितले. त्यांनी मराठी भाषा शिकून, ती बँकेच्या कामात वापरण्याचा शब्द दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. 

तसेच, राज ठाकरे यांनी इंडियन बँक असोसिएशनला पत्र पाठवून सर्व बँकांना प्रादेशिक भाषेचा वापर करण्याबाबत योग्य ती समज द्यावी, अन्यथा मनसेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ही बँकेची असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Share:

More Posts