धुळे -विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी वाहनांची तपासणी होत असून धुळ्यात एका कंटेनरमध्ये दहा हजार चांदीच्या विटा आढळून आल्या आहेत. या विटा एचडीएफसी बँकेच्या असल्याचे सांगण्यात येत असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत.धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे पोलिसांनी या कंटेनरची तपासणी केली होती. यावेळी या विटा आढळल्या असून त्याची बाजारातील किंमत ९४ कोटी ६८ लाख रुपये आहे.
