Home / मनोरंजन / उत्तर पश्चिम मुंबईतून शिंदे गटाची अभिनेता गोविंदा यांना उमेदवारी ?

उत्तर पश्चिम मुंबईतून शिंदे गटाची अभिनेता गोविंदा यांना उमेदवारी ?

मुंबई- उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाने प्रबळ उमेदवार शोधण्याची तयारी सुरू केली असताना या मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत अभिनेता आणि माजी...

By: E-Paper Navakal

मुंबई- उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाने प्रबळ उमेदवार शोधण्याची तयारी सुरू केली असताना या मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा यांचे नाव चर्चेत आलेले आहे. अभिनेता गोविंदा लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
पाच दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे आणि गोविंदाची भेट झाली होती. या दोघांत झालेल्या भेटीमुळे गोविंदा हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. त्यामुळे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या शर्यतीमध्ये अभिनेता गोविंदा याचे नाव चर्चेत आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. गजानन किर्तीकरांचे वय लक्षात घेता त्याच्या जागी सध्या गोविंदा यांच्या नावाची चर्चा आहे. याआधी गोविंदाने २००४ मध्ये उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवत भाजपच्या राम नाईकांच्या किल्ल्यांला भगदाड पाडत काग्रेसचा झेंडा त्या ठिकाणी रोवला होता.

Web Title:
संबंधित बातम्या