Samsung ने भारतात आपल्या M सिरीजमधील नवीन स्मार्टफोन Galaxy M56 5G लाँच केला आहे. यावर्षी Samsung ने 30,000 रुपयांच्या आतील सेगमेंटमध्ये या स्मार्टफोनच्या डिझाइनवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीने हा फोन 7.2mm पातळ आणि मागील मॉडेलपेक्षा 30% अधिक स्लिम असल्याचे सांगितले आहे. आकर्षक डिझाइनसोबतच Galaxy M56 5G मध्ये Samsung चा इन-हाउस चिपसेट आणि टिकाऊ बॅटरी लाईफसोबत फास्ट चार्जिंगची सुविधा मिळते.
Samsung Galaxy M56 5G: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Samsung Galaxy M56 5G मध्ये ग्लास बॅक आणि मेटल डेको कॅमेरा मॉड्यूल आहे. स्लिम असण्यासोबतच या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे, ज्यामुळे तो अधिक टिकाऊ बनतो. मात्र, यात IP रेटिंगची सुविधा नाही. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.7-इंचाचा फुल HD+ सुपर AMOLED+ डिस्प्ले आहे, जो 1200nits पर्यंत High Brightness Mode (HBM) आणि Vision Booster टेक्नॉलॉजी सपोर्ट करतो.
परफॉर्मन्ससाठी Galaxy M56 5G मध्ये 4nm Exynos 1480 प्रोसेसर, 8GB LPDDR5X RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजचा पर्याय आहे. थर्मल व्यवस्थापनासाठी यात वेपर कूलिंग चेंबर देखील आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास, यात OIS सपोर्ट असलेला 50MP चा मुख्य कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो लेन्स असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हा फोन Android 15 आधारित One UI 7 सोबत येतो. Samsung या फोनसाठी 6 वर्षांपर्यंत अँड्रॉइड अपग्रेड्स आणि 6 वर्षांपर्यंत सुरक्षा अपडेट्स देणार आहे.
Samsung Galaxy M56 5G: किंमत आणि उपलब्धता
Samsung Galaxy M56 5G लाईट ग्रीन आणि ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. 8GB + 128GB मॉडेलची सुरुवाती किंमत 27,999 रुपये आहे, तर 8GB + 256GB मॉडेलची किंमत 30,999 रुपये आहे. लॉन्च ऑफर अंतर्गत, HDFC बँक कार्डवर 3000 रुपयांची झटपट सूट देखील मिळत आहे. या फोनची अधिकृत विक्री 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Amazon आणि Samsung India च्या वेबसाइटवर सुरू होईल.