2025 Royal Enfield Hunter 350 | रॉयल एनफील्डने (Royal Enfield) त्यांच्या हंटरहूड (Hunterhood) फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईकपैकी एक असलेल्या हंटर 350 चे (2025 Royal Enfield Hunter 350) 2025 मॉडेस सादर केले आहे. 2025 रॉयल एनफील्ड हंटर 350 मध्ये तीन नवीन रंगांचे पर्याय आणि सुधारित फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की हे नवीन मॉडेल शहरी मोटरसायकलसाठी एक नवीन मापदंड तयार करेल.
2025 रॉयल एनफील्ड हंटर 350: बदल
नवीन रॉयल एनफील्ड हंटर 350 ने मागील मॉडेलमधील डिझाइन बऱ्यापैकी कायम ठेवले आहे. मात्र, आता यात 2025 च्या तीन नवीन रंगांचा समावेश करण्यात आला आहे: रिओ व्हाईट (Rio White), टोक्यो ब्लॅक (Tokyo Black) आणि लंडन रेड (London Red).
रंगांव्यतिरिक्त, कंपनीने वाहन चालवताना आराम मिळावा यासाठी काही बदल केले आहेत. यात सुधारित मागील सस्पेंशन सेटअप (rear suspension setup), एलईडी हेडलाईट्स, ट्रिपर पॉड आणि उत्तम रायडिंग अनुभवासाठी टाइप-सी यूएसबी फास्ट चार्जिंग यांचा समावेश आहे. तसेच, 2025 च्या हंटर 350 ची ग्राउंड क्लीयरन्स 10 मि.मी. ने वाढवण्यात आली आहे.
2025 रॉयल एनफील्ड हंटर 350 : इंजिन आणि पॉवरट्रेन
2025 रॉयल एनफील्ड हंटर 350 मध्ये मागील मॉडेलमधीलच इंजिन वापरण्यात आले आहे. यात 349 सीसीचे, एयर/ऑइल-कूल्ड, जे-सिरीज इंजिन आहे, जे 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हे इंजिन 20.2 बीएचपीची कमाल पॉवर आणि 27 एनएमचा टॉर्क निर्माण करते.
2025 रॉयल एनफील्ड हंटर 350 : व्हेरियंट्स आणि किंमत
2025 हंटर 350 साठी बुकिंग सुरू झाली असून, लवकरच डिलिव्हरीला सुरुवात होईल. यात तीन व्हेरियंट्स उपलब्ध आहेत: फॅक्टरी ब्लॅक (Factory Black), रिओ व्हाईट आणि डॅपर ग्रे (Dapper Grey), तसेच टोक्यो ब्लॅक, लंडन रेड आणि रेबेल ब्लू (Rebel Blue). नवीन रॉयल एनफील्ड बाइकची किंमत 1,49,900 ते 1,81,750 रुपयांच्या दरम्यान आहे.